श्री गणेश महासंघाच्या "श्री"ची खा.संदिपान भुमरे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना तर आ.अंबादास दानवे यांच्या हस्ते आरती...
श्री गणेश महासंघाच्या "श्री"ची खा. संदीपान भूमरेंच्या हस्ते प्रतिष्ठापणा तर आ.अंबादास दानवे यांच्या हस्ते आरती...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.14 निराला बाजार येथील श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात "श्री" ची प्रतिष्ठापणा सोमवारी (दि. 14) खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते तर आरती माजी विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गणेशोत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बंडू गुरुजी यांनी विधिवत गणरायाची प्रतिष्ठापणा करून पोलिस आयुक्त प्रविण पवार, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, श्री गणेश महासंघ उत्सव समीती अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे, कार्याध्यक्ष राजेंद्र दानवे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जोशी, यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. या प्रसंगी श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे माजी अध्यक्ष अभिषेक देशमुख, अनिकेत निल्लावार, कार्याध्यक्ष विशाल दाभाडे, संदिप शेळके, हरीश शिंदे, दिनेश राजेभोसले, प्रमोद ठेंगडे, नंदू लबडे, निनाद खोचे, मोहित त्रिवेदी, शिवाजी जोगदंड, समाधान पाटील, प्रल्हाद घुगे, बंटी चौधरी, सागर निकम, चंदू हिवाळे, ऋषिकेश हिवाळे, अभिषेक हिवाळे, विशाल जाधव, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांची उपस्थिती होती.
उद्या महापुरुषांच्या स्मारकांचे स्वच्छता अभियान...
जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने "श्री गणेशोत्सव" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत श्री गणेश भक्तांचा सहभाग वाढावा या उद्देशाने मंगळवारी (दि.15) सकाळी 8 वाजता शहरातील विविध भागात महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून क्रांती चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महापुरुष स्मारक स्वच्छता अभियानास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज, पैठण गेट येथील लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, सावरकर चौक येथे स्वातंत्र्यविर सावरकर, संभाजीपेठ येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्री बाई फुले, मिल कॉर्नर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज, यांच्या स्मारकांची साफ - सफाई करून अभिवादन करण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमास सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे यांनी
केले आहे.
What's Your Reaction?