गादीया विहार गणपती मंदीराचा माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी विकासकामे करुन केला कायापालट
गादिया विहार गणपती मंदिराचा विकासकामांचा मार्ग मोकळा
नगरसेवक तथा माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पाळला शब्द; नागरिकांकडून अभिनंदन व आभार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- गादिया विहार हौसिंग सोसायटी परिसरातील श्री गणपती मंदिराच्या विविध विकासकामांना अखेर पूर्णत्व आले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराचे (लाल गेट) रंगकाम व आवश्यक दुरुस्ती तसेच मंदिर परिसर आणि मंदिरासमोरील रस्त्यावर गट्टू (पेव्हर ब्लॉक) बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर परिसराला अधिक स्वच्छ, सुस्थित आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.
गादिया विहार हौसिंग सोसायटीतील नागरिकांकडून मंदिर परिसरातील विकासकामे करण्याची मागणी करण्यात आली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत नगरसेवक तथा माजी महापौर श्री. त्र्यंबक तुपे यांनी पुढाकार घेत संबंधित विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
नागरिकांच्या मागणीनुसार मंदिराच्या प्रवेशद्वाराची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली. तसेच मंदिर परिसर आणि समोरील रस्त्यावर गट्टू (पेव्हर ब्लॉक) बसविण्यात आल्याने भाविक तसेच परिसरातील नागरिकांना मोठी सोय झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल व अस्वच्छतेचा निर्माण होणारा त्रास कमी होण्यास या कामाचा फायदा होणार आहे.
सार्वजनिक ठिकाणच्या विकासकामांबाबत नागरिकांनी केलेल्या मागणीची तातडीने दखल घेऊन काम पूर्ण केल्याबद्दल गादिया विहार परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विकासकाम पूर्ण करून दिलेला शब्द पाळल्याबद्दल नगरसेवक तथा माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचे गादिया विहारवासीयांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि परिसराच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल तुपे यांचे नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. मंदिर परिसराच्या विकासामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण
आहे.
What's Your Reaction?