कारवाईच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पक्षाने केले संबळ वाद्य व गाजर दिखाव आंदोलन...!

 0
कारवाईच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पक्षाने केले संबळ वाद्य व गाजर दिखाव आंदोलन...!

कारवाईच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पक्षाचे संबळ वाद्य व गाजर दिखाव आंदोलन...

नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंता राकेश गुजरे व के.के. कन्स्ट्रक्शनवर कारवाईची मागणी

छत्रपती संभाजीनगर, दि. 31 (डि-24 न्यूज)- नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभाग, वैजापूर येथील तत्कालीन कार्यकारी अभियंता राकेश गुजरे तसेच के.के. कन्स्ट्रक्शन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी कार्यालयासमोर आज संबळ वाद्य व गाजर दिखाव आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने साखळी उपोषणाची दखल घेतली नसल्याने आंदोलकांनी अक्रामक होत हे आंदोलन केले. संबंधित प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप पक्षाने केला आहे. 

या मागणीसाठी 24 ऑगस्ट 2026 पासून संबंधित कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, संबंधित अधिकारी व एजन्सीविरोधात अद्याप कारवाई न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)च्या वतीने 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज एक तास संबंधित कार्यालयासमोर निषेधात्मक आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनादरम्यान प्रतीकात्मक स्वरूपात संभळ, वाघ व गाजर दाखवून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

हे आंदोलन मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. याबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास सुखधान यांनी संबंधित प्रशासनाला निवेदन दिले आहे.

प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई होते का, याकडे आता लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow