अनिल मकरिये यांची अचानक जन्म-मृत्यू विभागाला भेटीने खळबळ... तक्रारींची दखल

 0
अनिल मकरिये यांची अचानक जन्म-मृत्यू विभागाला भेटीने खळबळ... तक्रारींची दखल

स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांची जन्म-मृत्यू विभागाला अचानक भेट...

नागरिकांच्या तक्रारींची दखल; जन्म-मृत्यू विभागाची सभापतींकडून पाहणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि 19(डि-24 न्यूज )- महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नागरिकांना विविध कामांसाठी होत असलेल्या त्रासाची दखल घेत स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी बुधवारी अचानक भेट देऊन विभागाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विभागातील कामकाज, नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा तसेच प्रलंबित अर्जांबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि विभागातील प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना सभापती मकरिये यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अचानक झालेल्या या पाहणीमुळे विभागातील कामकाजाबाबत प्रशासनाकडून अधिक गांभीर्याने दखल घेतली जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow