उशिरा रात्री इम्तियाज जलिल मतीनच्या निवासस्थानी भेट, म्हणाले घर पाडणा-यांचे फुले वाहून स्वागत करणार...!
उशिरा रात्री इम्तियाज जलिल मतीन पटेल यांच्या निवासस्थानी, म्हणाले घर पाडणा-यांचे फुले वाहून स्वागत करणार...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- न्यायालयात नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाही तरीही सत्ताधाऱ्यांना त्यांचे घर पाडण्याची घाई झाली आहे. न्यायालयात अनधिकृत बांधकामांची नोटीस महापालिकेने काढली ती नोटीस बेकायदेशीर असल्याची व 15 दिवसांची मुदत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना एम आय एम ला निशाणा बणवण्यासाठी सत्ताधारी बदल्यांचे राजकिय करत आहे. उत्तर प्रदेश व अन्य राज्यांत बुलडोझर कारवाई केली जात आहे तशाच प्रकारे मतीनच्या घरावर उशिरा रात्री पोलिसांचा फौजफाटा आणून अतिक्रमण विभाग कार्यवाही करणार असल्याची माहिती मिळाली म्हणून मतीनच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी नारेगाव येथे आलो आहे. आपल्यावर कठीण वेळ आली आहे अशावेळी आपल्याला मतीनच्या पाठीमागे उभे राहायचे आहे. न्यायालय सात दिवसांची मुदत देणार असल्याची अपेक्षा असताना महापालिका 24 तासांची नोटीस देत आहे. मतीनच्या कुटुंबाने सांगितले मतीनवर असे अनेक घर कुर्बाण, घर पाडणा-यांचे फुलाने स्वागत करणार कायदा हातात घेणार नाही असे मतीनच्या आईने म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांचे अनधिकृत बांधकाम आहे याची माहिती अतिक्रमण विभागाकडे असताना मतीनचे घर पाडण्यासाठी घाई केली जात आहे. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी आम्ही मतीनला अलिशान घर बणवून देवू. नगरसेवक पद रद्द करण्याची भाषा केली जात आहे शहरातील कोणत्याही प्रभागितून निवडून आणू. लवकरच मतीन सोबत पुन्हा नारेगावात मी येणार आहे असे इम्तियाज जलिल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. याप्रसंगी सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?