चौका चौकात झळकले एम.के.देशमुख यांचे बॅनर...!

 0
चौका चौकात झळकले एम.के.देशमुख यांचे बॅनर...!

चौका चौकात झळकले एम.के.देशमुख यांचे बॅनर...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. पक्ष व अपक्ष इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. "बदल हवा, चेहरा नवा" एम.के.देशमुख, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी यांचे चौका चौकात झळकलेले बॅनरची. शिक्षण क्षेत्रात 35 वर्ष काम केल्यानंतर राजकीय प्रवास त्यांनी काँग्रेस पक्षात करुन सुरू केला आहे. सर्व खाजगी व शासकीय शाळेतील हा परिचित नवीन चेहरा या मतदार संघातील मतदार स्विकारतील का...? मराठा समाजातील देशमुख यांना जनतेचे प्रश्न काय आहेत याची कल्पना आहे. सर्व जाती धर्मातील लोक त्यांना ओळखतात. त्यांचा तगडा जनसंपर्क आहे. एम.के.देशमुख हे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात असल्याने त्यांनी आतापासूनच मतदार संघात बैठका सुरू केला आहे. सिडको एन-1, कामगार चौकात भव्य संपर्क कार्यालय थाटले आहे. कार्यकर्त्यांची तेथे गर्दी होत आहे. त्यांनी आज मुस्लिम बहुल वार्डात बैठक घेतली. तेथे त्यांनी सांगितले शिक्षण, आरोग्य व रोजगार या क्षेत्रात दहा वर्षांत काम झाले नाही. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे विकासाकडे कोणाचे लक्ष नाही. म्हणून या मतदारसंघात पक्षाने उमेदवारी दिली तर मतदारांचा कौल मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. आता बघावे लागेल एम.के.देशमुख यांच्या गळ्यात काँग्रेसच्या उमेदवारीची माळ पडते की अन्य कोणाला तिकीट मिळते हे बघावे लागेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow