जी.श्रीकांत यांची विभागीय आयुक्त म्हणून घरवापसी, गंगारन डी.जलजीवन मिशनचे संचालक...!

 0
जी.श्रीकांत यांची विभागीय आयुक्त म्हणून घरवापसी,  गंगारन डी.जलजीवन मिशनचे संचालक...!

जी.श्रीकांत यांची विभागीय आयुक्त म्हणून घरवापसी, गंगा़रन डी. जलजीवन मिशनचे संचालक...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) - जलजीवन मिशन, मुंबई संचालक जी श्रीकांत यांची शासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त म्हणून बदली करुन घरवापसी केली आहे. गंगारण डि.हे जलजीवन मिशनचे संचालक म्हणून पदभार घ्यावे असे आदेश शासनाने आज काढले आहेत. दहा दिवसांपूर्वी तात्कालिन महापालिका आयुक्त जी.श्रीकांत यांची बदली झाली होती. त्यांच्या रिक्त जागेवर अमोल येडगे महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. आज जी.श्रीकांत यांची विभागीय आयुक्त म्हणून बदलीचे आदेश निघाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट व मंत्री अतुल सावे हे जी.श्रीकांत यांची बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. परंतु आज नवीन विभागीय आयुक्त म्हणून सह सचिव सुभाष उमराणीकर यांच्या सहीचे आदेश धडकले. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून जी.श्रीकांत पदभार स्वीकारणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow