पाणी प्रश्नावर एसडीपिआय अक्रामक, महापालिकेसमोर केले आंदोलन...!
पाणी प्रश्नावर एसडीपिआय अक्रामक, महापालिकेसमोर केले आंदोलन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- तापत्या उन्हात
शहरातील नागरीक भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहे. नळाला सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे या मागणीसाठी एसडिपिआयने अक्रामक होत आज दुपारी मनपा मुख्यालयासमोर आंदोलन केले. यासोबतच विविध नागरी समस्यांच्या निषेधार्थ सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या वतीने महापालिकेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी लढा देण्याचा इशारा दिला. SDPI चे जिल्हाध्यक्ष समीर शाह यांनी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
त्यांनी सांगितले की, “हे केवळ राजकीय आंदोलन नसून नागरिकांच्या हक्कांसाठीचा लढा आहे. शहरातील पाणीटंचाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. प्रशासनाने त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
यावेळी कार्यकर्त्यांनी अवैध बुलडोजर कारवाई थांबवावी, कचरा व्यवस्थापन सुधारावे, रस्ते व ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त करावी अशा विविध मागण्याही केल्या. तसेच हॉकर्ससाठी स्वतंत्र झोन तयार करण्याची मागणीही करण्यात आली.
SDPI कडून प्रशासनाला इशारा देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश महासचिव सय्यद कलिम, जिल्हाध्यक्ष समीर शाह, महासचिव मोहसीन खान, भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अलीयारखान, जिल्हा महासचिव अलीम शेख, रियाज सौदागर, शेख मुश्ताक, हाजी समीउल्लाह, साजिद पटेल आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?