मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस व दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर

 0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस व दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस व दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व कमलनयन बजाज रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्तन आरोग्य अभियान’ शहरव्यापी मोफत व सवलतीच्या दरात डिजिटल मॅमोग्राफी स्क्रीनिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानुषंगाने, दिनांक 22 जुलै 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता कमलनयन बजाज रुग्णालय, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर येथे श्री. समीर राजूरकर, महापौर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या शुभहस्ते ‘स्तन आरोग्य अभियान’ अंतर्गत डिजिटल मॅमोग्राफी स्क्रीनिंग कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत NP-NCD (राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक व नियंत्रण कार्यक्रम) अंतर्गत स्तन कर्करोगाचे लवकर निदान व वेळेत उपचार व्हावेत, या उद्देशाने शहरातील महिलांसाठी मोफत व सवलतीच्या दरात डिजिटल मॅमोग्राफीद्वारे स्तन कर्करोग तपासणी (Digital Mammography Screening) करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत खालील प्रमाणे स्त्रियांचे मोफत स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व महिला ज्या दारिद्र्यरेषेखालील (BPL) आहेत किंवा समाजातील गरीब घटकातील आहेत.

30 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या BPL किंवा गरीब महिला, ज्यांच्या प्रथम-श्रेणी नातेवाईकांत (आई, बहीण, मुलगी) स्तनाच्या कर्करोगाचा इतिहास आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow