महाराष्ट्रातील S I R प्रक्रीयेस दोन महीन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी...!
महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेस दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी; उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद )दि. 21(डि-24 न्यूज)- महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेस केवळ 8 ऑगस्ट 2026 पर्यंत दिलेली मुदत अपुरी असल्याने किमान आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, तसेच व्यापक जनजागृती, तांत्रिक सुधारणा आणि प्रक्रियेत आवश्यक बदल करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना उद्देशून उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रासारख्या सुमारे 12 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात SIR प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी सध्याची मुदत अपुरी आहे. खरीप हंगामातील पेरणीमुळे लाखो शेतकरी व्यस्त आहेत, तर आषाढी वारी व इतर धार्मिक कार्यक्रमांमुळे मोठ्या संख्येने वारकरी आपल्या गावापासून दूर आहेत. अनेक भागांत Pre-SIR Mapping पूर्ण झालेले नाही, BLO यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण आहे आणि विविध तांत्रिक अडचणीही कायम आहेत. त्यामुळे अनेक पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनाद्वारे SIR प्रक्रियेस किमान दोन महिन्यांची मुदतवाढ देणे, BLO यांना आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून देणे, घराघरांत अर्ज वितरण काटेकोरपणे करणे, राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबविणे, मराठीसह स्थानिक भाषांमध्ये अधिकृत माहिती व व्हिडिओ प्रसिद्ध करणे, ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करणे आणि कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही याची खात्री करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रतिनिधी मंडळाने सांगितले की, सध्या महाराष्ट्रात कोणतीही तातडीची निवडणूक नसल्याने SIR प्रक्रियेस मुदतवाढ देण्यास कोणताही प्रशासकीय अडथळा नाही. त्यामुळे लोकशाही मूल्यांचे संरक्षण, मुक्त व निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या प्रतिनिधी मंडळामध्ये शेख मोहसिन (जिल्हाध्यक्ष, मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर), शेख मुख्तार (शहराध्यक्ष), आदिल मदनी, शेख बशीर, सुरेश पवार, लक्ष्मण नेरुट्टी गुरुखेल, अनिल गुप्ता, डॉ. सलमान मुकर्रम, फैजान काझी, जाव्वाद कादरी, मखदूमी हिसामुद्दीन, अब्दुल कय्यूम आणि फहीम मलिक यांचा समावेश हो
ता.
What's Your Reaction?