तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याने नगरसेवक मेहराज खान यांना अटक...
तिसरे अपत्याची माहिती लपवल्याने नगरसेवक मेहराज खान यांना अटक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- प्रभाग क्रमांक 6 मधून निवडून आलेले एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान जलील खान यांनी तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याने चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर उशिरा रात्री त्यांना अटक केली आहे. नाशिक टिसीएस धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी नीदा खानला आश्रय दिल्याने एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल हे नाशिकच्या जेलमध्ये आहे. आता मेहराज खान यांना आज उशीरा रात्री अटक झाल्याने एमआयएमला धक्का बसला आहे.
तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याने निलोफर मेहराज खान , मिनाज खान जलील खान, इकरा मिनाज खान, इलियास कदीर सिद्दीकी , सज्जू उस्ताद, एक अल्पवयीन यांनी मुलाचे बनावट कागदपत्रे बनवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपिआय मनोज शिंदे करत आहे.
What's Your Reaction?