मानवत तालुक्यातील मंदीराचा गाभारा कोसळला, दोन जणांचा मृत्यू, 16 जण जखमी...
मानवत तालुक्यातील मंदीराचा गाभारा कोसळला, दोन जणांचा मृत्यू, 16 जखमी...
परभणी, दि.20(डि-24 न्यूज)- मानवत तालुक्यातील कोल्हा शिवारातील यशवाडी येथील हनुमान मंदीराच्या निर्माण काम सुरू असताना गाभारा कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दर्शन व प्रसाद घेताना अचानक काळाचा घाला आला आहे. तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले.
या घटनेत संतोष गदाडे, राहणार गदाडे पांगरा, आकाश सरजोसे, राहणार परभणी यांचा मलब्याखाली दबून दुर्देवी मृत्यू झाला आहे.
या घटनेत अनिकेत संतोष गाडे, राहणार मंठा, हनुमंत निपाणे, राहणार बोरगांव, प्रविण प्रकाश राजबिडे, नारायण दौलत खरात, जवळा, दादाराव नागोजी भनगे, जवळा, रामकृष्ण बडादे, माजलगाव, परमेश्वर कुंडलीक राऊत, राहणार लोनी, केशव गिरी, देवळगांव अवचर, नागेश विठ्ठल इक्कर, कुंभारी, प्रविण रघुनाथ हलगे, सेलू, ओमकार मारुती कोथळकर, निताली, सौरभ गजानन कोथळकर, केकर जावळा, ऋषीकेश कोथळकर(Casuality), निताली, रामा घुगे, नगर जावळा, रामेश्वर बोंडे, चिंचोली, धनंजय बोचरे( PICU), कुंभारी बाजार हे 16 जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या घटनेचे अगोदरचे छायाचित्र या बातमीत प्रसिद्ध केले आहे.
What's Your Reaction?