मोबाईल अॅपद्वारे खत वितरण, तक्रार निवारणासाठी तालूकानिहाय हेल्पलाईन नंबर...
पथदर्शी प्रकल्पः मोबाईल ॲपद्वारे खत वितरण;
तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाईन सुविधा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- राष्ट्रीय खत विक्री आराखड्यानुसार मोबाईल ॲपद्वारे खत नोंदणी व वितरण करण्यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’, चा पथदर्शी प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविला जात आहे. शुक्रवार दि.५ पासून हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. याबाबत शेतकऱ्यांना काही तक्रार, अडीअडचणी वा शंकानिरसन करावयाचे असल्यास त्यासाठी तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे,असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी व जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या तालुकानिहाय नेमलेल्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी, अडीअडचणी निवारणासाठी नियुक्त अधिकारी व त्यांचे संपर्क क्रमांक याप्रमाणे-
जिल्हास्तरीय हेल्पलाईन
पंकज अण्णासाहेब ताजणे-९४०४३०३१२८, हरिभाऊ सिताराम कातोरे- ९१८५२२०४३५
तालुकास्तरीय हेल्पलाईन
छत्रपती संभाजीनगर-
गोविंद रामकिशन पौळ-९७६३७१५०४, दिनकर आनंदराव जाधव-९४२१३११४१२
*पैठण-*
राधाकृष्ण लक्ष्मण कार्ले-९४२२२२९८१८,संतोष अर्जून जाधव-९८५०१८१६२३
*फुलंब्री-*
शांतिलाल दामोधर हिवराळे-७५८८७९३०३५,रामराव मारोतराव बेम्बरे-८८३०४५२७०७
*वैजापूर-*
रविंद्र अशोक उराडे-९४२०४९०३७६,जगदीप ज्ञानबा वाघमारे-७५८८०८९६७४
*गंगापूर-*
प्राजक्ता संजय रणसिंग-७०२८३७१७७१,अजय पुरुषोत्तम गवळी-७५८८८१२४२४
*खुलताबाद-*
काकासाहेब नवनाथ इंगळे-९६६५६०६५७८,हणमंत रामा बोयनर-९४२३८४४७१२
*सिल्लोड-*
गजानन लक्ष्मण कुडके-९४०४६९३८५१,सुनील सर्जेराव सूर्यवंशी-९५११६६९६६५
*कन्नड-*
मनोजकुमार पंडीत सैंदाणे-९४०४६८०४२४,विश्वास गोपाळराव अधापुरे-८२७५२४३९०५
*सोयगाव-*
रमेश ग्यानोबा गुंडीले-९४२२२२९९१९,संतोष वैजनाथ भालेराव-९६५७३४४९१४
त्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे खते मिळवण्याबाबत येणाऱ्या अडचणी, शंका निरसनासाठी संबंधित तालुक्यातील अधिकाऱ्यांशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?