राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या घरी गणरायाचे आगमन
 
                                राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन
छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.7(डि-24 न्यूज) राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या निवासस्थानी शनिवारी श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाचे आगमन झाले. यावी सावे कुटुंबीयांतर्फे विधिवत पूजा करत विघ्नहर्ताचे सहर्ष स्वागत केले.
ज्योती नगर येथील निवासस्थानी श्री अजिंक्य सावे आणि स्नुषा सौ. ऐश्वर्या अजिंक्य सावे यांच्या हस्ते विधिवत पूजन करत आज गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी गणरायाच्या आगमनाचे स्वागत केले. सहकुटुंब गणरायाची आरती करून गणपती बाप्पा मो-याच्या जय घोषात गणेश उत्सवाचा पहिला दिवस आनंदात आणि उत्साहात साजरा केला. याप्रसंगी सर्व सावे कुटुंबीयांच्या वतीने राज्याच्या सुखी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. या प्रसंगी श्री अतुल सावे त्यांच्या पत्नी सौ अंजली सावे, मुलगा अनुराग सावे यांची उपस्थिती होती.
या देशात आणि शहरात नेहमी सुखशांती, भरभराटी राहो, तसेच शेतकरी बांधव देखील आनंदी राहो माता भगिनिंची सुरक्षा कायम मिळो अशी प्रार्थना यावेळी मंत्री श्री अतुल सावे यांच्या वतीने गणरायाच्या चरणी केली.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            