ठेकेदाराने घासमंडी रस्ता अर्धवट सोडल्याने नागरीकांना त्रास, पाणी साचल्याने पडत आहे लोक
ठेकेदाराने घासमंडी रस्ता अर्धवट सोडल्याने नागरीकांना त्रास, पाणी साचल्याने पडत आहे लोक
छ.संभाजीनगर(औरंगाबाद),दि.7(डि-24 न्यूज) घासमंडीत कापडाची दुकाने आहेत. दिवसभर येथे वर्दळ असते. एका महीन्यापासून हा रस्ता खोदून ठेकेदाराने पूर्ण केला नाही. रस्त्यावर खड्डे असल्याने पावसाचे पाणी साचल्याने चालणारे लोक या खड्ड्यात पडून अपघात होत आहेत. या खड्ड्यात आठ ते दहा लोक पडले. किरकोळ जखमी झाले तरीही मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. सिटी चौक व लोटाकारंजा या दोन रस्त्यांना जोडणारा रस्ता हा आहे म्हणून वाहनधारकांना गाडी चालवताना सुध्दा त्रास होत आहे. येथील रहिवाशांनी मनपा प्रशासनाला हा रस्ता तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे. आजपासून गणपती उत्सव सुरू झाला आहे यामुळे सिटी चौक भागात गर्दी होते. नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ या अर्धवट सोडलेल्या रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
What's Your Reaction?