महापालिका शाळेचे विद्यार्थी इंडिया गाॅट टॅलेंट मध्ये...

मनपा प्रियदर्शनी चे विद्यार्थी जाणार इंडिया गॉट टॅलेंट मध्ये...
टाकाऊ वस्तु पासून निर्माण केला सिंफनी बँड...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) - महानगरपालिका प्रियदर्शनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ व तुटक्या फुटक्या वस्तू पासून विविध वाद्य बनवून प्रियदर्शनी सिम्फनी बँडची निर्मिती केली.
घरातील फुटक्या बादल्या तुटलेले ड्रम घमेले अशा साहित्यातून संगीताची निर्मिती करत महानगरपालिकेच्या शाळेत
विद्यार्थी संगीताचे धडे घेत आहेत.
या शाळेतील शिक्षण शिक्षण घेणारी विद्यार्थी मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहेत त्यांच्याकडे वाद्य घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात.
मात्र त्यांच्यात असलेले कला कौशल्य विकसित व्हावे यासाठी प्रियदर्शनी शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार व संगीतशिक्षक काकासाहेब जाधव उर्फ टायगर यांनी एक अनोखा प्रयोग केला त्यामुळे गरीब कुटुंबातील या विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण झाली.
त्यांच्या मधील कलागुणांना वाव मिळाला आहे. यंदाचा स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात या पथकाचे वेगवेगळ्या ठिकाणी सादरीकरण होणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून सर्व केंद्रीय शाळांना विविध संगीत साहित्य पुरवण्यात आले होते.
तसेच संगीत शिक्षक देखील पुरवण्यात आले. परंतु जे साहित्य मिळाले ते सर्वच विद्यार्थ्यांना वापरता येत नव्हते.
त्यामुळे संगीत शिक्षक काकासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरामध्ये असलेल्या बकेट, घमेले, तुटलेले भांडे हे घेऊन त्याच्यावरती रिदम शिकवला आणि आज या शाळेतील विद्यार्थी कोणत्याही गाण्यावर हे वाद्य वाजवत आहेत. विशेष म्हणजे यातील फक्त एकच इलेक्ट्रॉनिक वाद्य आहे सिंथेसाईजर त्या वाद्यावरती वेगवेगळ्या ट्युन्स वाजवल्या जातात आणि विद्यार्थी डब्यांच्या साह्याने त्याच्यावरती संगीताची साथ देतात.
हा बँड धारावीतील युवकांनी तयार केलेल्या बँडच्या प्रेरणे मधून तयार करण्यात आलेला आहे.
प्रियदर्शनी सिम्पनी बँक याचे व्हिडिओ इंस्टाग्राम वर बघून आज मुख्याध्यापक संजीव सोनार यांना इंडिया गॉट टॅलेंट येथून विद्यार्थ्यांचे चित्रीकरण करण्यासाठी घेऊन येण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
यासाठी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांना व संगीत शिक्षकांना प्रोत्साहन देत आहेत.
सिंथेसायझर वाजवणारी शिवानी बर्गे ही वर्ग नववी मध्ये शिक्षण घेत आहे. शाळा संपल्यानंतर ती आपल्या आईसोबत कॉलनीमध्ये इतर लोकांच्या घरी घरकामाच्या मदतीसाठी जाते.
अनेक मुले देखील शाळेच्या वेळेव्यतिरिक्त आपल्या आई वडिलांना कामात मदत करतात. शिवानीने तिच्या मनोगतामध्ये सांगितले की संजीव सोनार मुख्याध्यापक यांनी मला घरी सिंथेसाईजर घेऊन जाण्याची परवानगी दिल्यामुळे मी दररोज घरी गाण्यांचा सराव करते.
यामुळे माझ्या घरातील वातावरण अतिशय आनंदी झालेले आहे.
परिसरातील नागरिक देखील मी सिंथेसाईजर वर गीते सादर करत असताना दरवाजामध्ये येऊन उभे राहतात. आणि टाळ्या वाजवून मला प्रोत्साहित करतात.
हे बघून मला खूप आनंद होतो.
या बँड पथकामध्ये शिवानी बर्गे, गौतम वाघमारे,
साहद शेख, श्रेयस मुंढे,
वैभव सोनवणे, पियुष मोरे, करण वाकळे व इतर विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
या बँडची निर्मिती मनपाचे आयुक्त जी श्रीकांत, उपायुक्त अंकुश पांढरे तसेच शिक्षण समन्वयक गणेश दांडगे शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिम्फनी बँड ची निर्मिती होत आहे.
What's Your Reaction?






