कर वसुलीसाठी उद्या सर्व झोन कार्यालय उघडे राहणार...

कर वसुली साठी उद्या सर्व झोन कार्यालय उघडे राहणार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 14(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांचा संकल्पनेतून "शास्ती से आझादी" या मोहिमे अंतर्गत दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत रहिवासी थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यावर 95% ची सूट देण्यात आली होती. नंतर एक ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत ही योजना सर्व प्रकारच्या मालमत्तांवरील थकीत कर एक रकमी भरल्यावर 95 टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली.
सदरील मोहिमेच्या उद्याच्या शेवटच्या दिवस असून उद्या सर्व 10 झोन कार्यालय कर वसुलीसाठी उघडे राहतील असे आदेश जी श्रीकांत यांनी दिले आहे.
या मोहिमे अंतर्गत आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी सर्व 10 झोन मध्ये 14.40 कोटी अशी विक्रमी वसुली एका दिवसात झालेली आहे, तर आतापर्यंत घरपट्टी आणि पाणीपट्टी मिळवून सुमारे 148 कोटी रुपये कर वसुली झालेली आहे. सुट्टीच्या दिवशी पण नागरिकांची सोयीसाठी सर्व झोन कार्यालय दिनांक 15 ऑगस्ट रोजी सुरू राहतील. या संधीच्या नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जी श्रीकांत यांनी यावेळी केले आहे.
What's Your Reaction?






