22 जूनला शहरातील पाणी पुरवठा खंडण काळ...

 0
22 जूनला शहरातील पाणी पुरवठा खंडण काळ...

22 जून रोजी पाणी पुरवठा खंडण काळ

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत

प्रगतीपथावर आहे. मजीप्रा मार्फत 900 मीमी व्यासाची जलवाहिनी 56 दलली पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत

टाकण्यात आलेली आहे. सदरील जलवाहिनीवर मजीप्राची उर्वरीत कामे पुर्ण करण्यासाठी तसेच 900 मीमी

व्यासाची उध्दरण वाहिनी पुर्ण क्षमतेने कार्यान्वीत करण्यासाठी संबंधीतांमार्फत जायकवाडी उदभव, ढोरकीन

या ठिकाणी विविध कामे पुर्ण करण्यात येणार आहे. या करीता 900 मीमी व्यासाच्या जलवाहिनीवर मजीप्राने

दिनांक 22.06.2025 रोजी 12 ते 14 तासांचा खंडणकाळ मागीतला आहे. शहर पाणी पुरवठा प्राधान्य लक्षात

घेता मजीप्राला खंडणकाळ देण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक महोदय यांनी मान्यता प्रदान केली आहे.

उपरोक्त खंडणकाळाच्या कालावधीत 900 मीमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे शहरास होणारे 20 दलली पाणी

परिमाण कमी होणार आहे. यामुळे शहर वितरणात अशंत: परिणाम होणार आहे. सदर खंडणकाळामुळे शहर

व सिडको परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने, उशीरा होईल. उपरोक्त बाबी लक्षात घेता कृपया नागरीकांनी

महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow