राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहागंज येथील ऐतिहासिक गांधी पुतळ्याच्या इतिहासाचा उलगडा...
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहागंज येथील ऐतिहासिक गांधी पुतळ्याचा इतिहासाचा उलगडा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- शहरातील शहागंज येथील महात्मा गांधींचा पुतळा हा केवळ एक स्मारक नसून शहराच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. या पुतळ्याचे लोकार्पण 2 ऑक्टोबर 1952 रोजी तत्कालीन भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार तत्कालीन औरंगाबाद शहर ठरले होते.
शहरातील हा पहिला पुतळा जयपूर येथून आणण्यात आला होता, अशी माहिती उपलब्ध आहे. महात्मा गांधींच्या विचारांची आणि स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींची जपणूक करणाऱ्या या पुतळ्याला शहराच्या इतिहासात विशेष स्थान आहे.
गांधी जयंतीसह विविध प्रसंगी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते या पुतळ्याला अभिवादन करतात. अनेक आंदोलने, उपोषणे आणि सामाजिक उपक्रमांचेही हे ठिकाण साक्षीदार राहिले आहे. त्यामुळे शहागंजचा गांधी पुतळा हा शहराच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचाही एक भाग बनला आहे.
दरम्यान, 1952 मध्ये झालेल्या गांधी पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याची काही दुर्मिळ छायाचित्रे D-24 न्यूजच्या हाती लागली आहेत. या छायाचित्रांमधून त्या ऐतिहासिक सोहळ्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, या लोकार्पण सोहळ्यावेळी प्रसिद्ध मराठी गायक आणि रंगभूमीवरील अभिनेते बालगंधर्व यांनी राष्ट्रगीत सादर केले होते, अशी माहितीही उपलब्ध आहे. त्यामुळे शहागंज येथील गांधी पुतळ्याचा इतिहास हा केवळ एका स्मारकापुरता मर्यादित नसून स्वातंत्र्योत्तर भारताच्या सुरुवातीच्या काळातील अनेक ऐतिहासिक आठवणींशी जोडलेला आहे.
आज गांधी जयंतीच्या निमित्ताने या ऐतिहासिक पुतळ्याकडे पाहताना महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्य आणि शांततेच्या विचारांची आठवण होते. शहराच्या इतिहासाची साक्ष देणारा हा वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करणे ही काळाची गर
ज आहे.
What's Your Reaction?