सईदा काॅलनी येथे गुंठेवारी प्रक्रिया करण्यासाठी कार्यालयाचे उद्घाटन, नागरिकांना गुंठेवारी भरण्याचे आवाहन
सईदा काॅलनी येथे गुंठेवारी प्रक्रिया करण्यासाठी कार्यालयाचे उद्घाटन
एमआयएम शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांच्या हस्ते एम.के.इंटरप्राईजेसचे शानदार उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- 31 ऑक्टोबर पर्यंत महापालिका प्रशासनाने मालमत्तांची गुंठेवारी करण्यासाठी 50 टक्के सवलत दिली आहे. मुदतीपूर्वी हि प्रक्रिया करणे आवश्यक आहे नाही तर अवैध मालमत्तांवर कारवाई होणार आहे. म्हणून नागरीकांच्या सवलतीसाठी एमआयएमने पुढाकार घेत प्रभाग क्रमांक 1 एमआयएमचे नगरसेवक अशोक हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुंठेवारी प्रक्रिया करण्यासाठी एम.के.इंटरप्राईजेस
कार्यालयाचे उद्घाटन कासम मस्जिदच्या बाजूला शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
याप्रसंगी शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी गुंठेवारी भागातील मालमत्ता धारकांना आवाहन केले नागरिकांनी मुदतीपूर्वी हि प्रक्रिया करुन चालान भरून घ्यावे. सध्या दुष्काळ असल्याने मुदत वाढवण्यासाठी एमआयएमचे नगरसेवक सभागृहात मागणी करतील परंतु कार्यवाई टाळण्यासाठी गुंठेवारी करुन घ्यावी. या कार्यालयात गुंठेवारी प्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शन करुन फाईल महापालिकेत दाखल करुन प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. अशी माहिती यावेळी अब्दुल मलिक यांनी दिली आहे.
याप्रसंगी नगरसेवक अजहर पठाण, युनुस पटेल, आशिष जाधव, एम. के. इन्टरप्राईजेसचे संचालक अब्दुल मलिक शेख, मुबारक शेख, हाफीज शौकत, मुन्शी पटेल, अज्जू पटेल, शेख इम्रान, मुजीब जहागिरदार, जुबेर शेख, जफर पठाण आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?