पोलिस अधिकारी असल्याचे भासवून महीलेची तीन कोटीं हून अधिक रुपयांची फसवणूक

 0
पोलिस अधिकारी असल्याचे भासवून महीलेची तीन कोटीं हून अधिक रुपयांची फसवणूक

पोलिस अधिकारी असल्याचे भासवून 75 वर्षीय महिलेची 3 कोटी 80 लाखांची फसवणूक; 14 दिवस डिजिटल अटकेत ठेवले...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- पोलिसांची वर्दी, मागे तिरंगा आणि पोलिसांचा झेंडा अशा बनावट दृश्यांच्या माध्यमातून 75 वर्षीय महिलेला समोर बसलेले व्यक्ती पोलिस अधिकारी असल्याचा विश्वास देत सायबर ठगांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात महिलेच्या बँक खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत असल्याचे सांगून तिला घाबरवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा अशोक कुलकर्णी (वय 75, रा. व्यंकटेशनगर) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख नाशिक येथील गुन्हे शाखेचा अधिकारी अशी करून दिली. त्याने आपले नाव राजन भिसे असल्याचे सांगितले.

त्यानंतर आरोपीने शुभदा कुलकर्णी यांच्या नावाने मुंबईतील केनरा बँकेत खाते उघडण्यात आले असून, त्या खात्यातून दहशतवादी कारवायांसाठी पैसे पाठवले जात असल्याचा दावा केला. तसेच आरबीआयकडून चौकशी, अटक आणि कुटुंबीयांना नुकसान पोहोचवण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेला सायबर ठगांनी तब्बल 14 दिवस डिजिटल पद्धतीने नजरकैदेत ठेवल्याचा आरोप आहे.

पाच बँक खात्यांतून 3.80 कोटींची रक्कम

सायबर ठगांनी वेगवेगळ्या पाच बँक खात्यांमधून आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल 3 कोटी 80 हजार रुपये ठगांच्या सांगितलेल्या खात्यांमध्ये पाठविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान घडल्याचे समोर आले आहे.

एका आरोपीने फोन करून संबंधित खात्यात दोन कोटी रुपये जमा झाल्याचे सांगितले. त्यापैकी दोन लाख रुपये कमिशन म्हणून कुलकर्णी यांच्या खात्यात पाठविण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. त्यांच्या सर्व बँक खात्यांची माहिती आरबीआयकडून तपासली जात असल्याचे सांगून त्यांना आणखी घाबरवण्यात आले.

सायबर ठगांच्या धमक्यांमुळे महिला त्यांच्या सूचनांचे पालन करत राहिल्या. अखेर या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली असून, जिन्सी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात सायबर ठगांनी पोलिस अधिकारी असल्याचे भासवून, बनावट व्हिडिओ कॉल आणि गंभीर आरोपांच्या माध्यमातून 75 वर्षीय महिलेला जाळ्यात ओढल्याचे तक्रारीवरून समोर आले आहे.

21 सप्टेंबर रोजी ठगांनी कुलकर्णी यांच्या कडून सर्व बँक आणि व्यवहार

गणवेश परिधान करून व्हिडिओ कॉल, मागे तिरंगा

सायबर ठगांनी व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला. कॉलमध्ये एक व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात बसलेली दिसत होती. त्याच्या मागे तिरंगा आणि पोलिसांचा निळा झेंडाही दिसत होता. या दृश्यामुळे संबंधित महिलेला समोर पोलिस अधिकारीच असल्याचा विश्वास बसला.

18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान महिलेला दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी फोन करण्यात आले. या काळात तिला सतत निगराणी आणि चौकशीची भीती दाखवण्यात आली.

एफडीची माहितीही घेतली

21 सप्टेंबर रोजी ठगांनी कुलकर्णी यांच्याकडून त्यांच्या सर्व बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली. त्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचीही चौकशी करण्यात आली.

त्यांना सांगण्यात आले की, आरबीआयची चौकशी सुरू आहे आणि कोणालाही माहिती दिल्यास त्यांच्या कुटुंबाला नुकसान पोहोचवले जाईल. त्यानंतर वेगवेगळ्या बँकांमधील ठगांनी उघडलेल्या खात्यांमध्ये आरटीजीएस करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला.

पाच खात्यांमधून कोट्यवधींची रक्कम

सायबर ठगांनी 23 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान पाच वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण 3 कोटी 80 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले.

23 सप्टेंबर: देवगिरी नागरी सहकारी बँकेकडून 62 लाख रुपये

28 सप्टेंबर: सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 89 लाख रुपये

29 सप्टेंबर: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 54 लाख रुपये

1 ऑक्टोबर: एचडीएफसी बँकेकडून 55 लाख रुपये

1 ऑक्टोबर: एसबीआय खात्यातून 40 लाख 80 हजार रुपये

एकूण रक्कम : 3 कोटी 80 हजार रुपये

मुलाच्या अटकेची आणि कुटुंबाला नुकसान करण्याची धमकी

शुभदा कुलकर्णी घरात एकट्याच राहतात. त्यांचा मुलगा जामनगर येथे रिलायन्स कंपनीत कार्यरत आहे, तर मुलगी अमेरिकेत राहते. सायबर ठगांनी मुलालाही अटक करण्याची तसेच कुटुंबाला नुकसान पोहोचवण्याची धमकी देऊन महिलेला भयभीत केले.

सततच्या धमक्या आणि बँक खात्यांमधून मोठी रक्कम गेल्यानंतर कुलकर्णी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सायबर ठगांचा शोध सुरू केला.

32 लाख रुपये केले फ्रीज

फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर शुभदा कुलकर्णी यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ठगीच्या एकूण रकमेपैकी 32 लाख रुपये फ्रीज करण्यात यश मिळवले.

पोलिसांनी सांगितले की, उर्वरित रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर झाली आहे, ती रक्कम फ्रीज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow