सहारा फ्रेंड्स फाऊंडेशनच्या रक्तदान शिबीरात विक्रमी रक्तदान, 515 रक्तदात्यांचा प्रतिसाद

 0
सहारा फ्रेंड्स फाऊंडेशनच्या रक्तदान शिबीरात विक्रमी रक्तदान, 515 रक्तदात्यांचा प्रतिसाद

सहारा फ्रेंड्स फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदान; 515 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...!

तापत्या उन्हातही युवकांचा पुढाकार; गरजू रुग्णांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकीचे दर्शन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25 (डी-24 न्यूज) : घाटी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये, या सामाजिक उद्देशाने शहरातील प्रसिद्ध सहारा फ्रेंड्स फाऊंडेशनच्या वतीने जिल्ला खासगी रुग्णालयाच्या आवारात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तापत्या उन्हाची तमा न बाळगता सायंकाळपर्यंत तब्बल 515 रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रमी सहभाग नोंदविला. युवकांच्या या सामाजिक योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गरजू रुग्णांसाठी फाऊंडेशनचा पुढाकार

मराठवाड्यासह विविध भागांतून गरीब आणि गरजू रुग्ण उपचारासाठी घाटी रुग्णालयात येतात. गंभीर आजारांवरील उपचारादरम्यान अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. घाटी रुग्णालयात सेवा देताना रक्ताची गरज लक्षात आल्यानंतर सहारा फ्रेंड्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी वेळ न दवडता रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

फाऊंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाला युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दिवसभरात 515 जणांनी रक्तदान केल्याने शिबिराला मोठे यश मिळाले. या उपक्रमासाठी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे तसेच सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे फाऊंडेशनचे हाफीज जुबैर आणि सर्व सदस्यांनी आभार मानले.

घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे सहकार्य

या रक्तदान शिबिराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे तसेच शासकीय रक्तपेढीचे संचालक डॉ. भरत सोणवणे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहकार्य केले. त्यांच्या पथकानेही शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले.

रक्तदात्यांसाठी शिबिरस्थळी अल्पोपहार, चहा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विविध राजकीय पक्षांचे नेते, नगरसेवक आणि समाजसेवक यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्या युवकांचा उत्साह वाढविला.

फाऊंडेशनच्या सदस्यांचे परिश्रम

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मुनशी पटेल, ताहेर पटेल, हाफीज जुबैर, माजिद पटेल, सीए हाकिम पटेल यांच्यासह फाऊंडेशनच्या संपूर्ण टीमने आणि युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने आयोजित केलेल्या या शिबिरात 515 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सहारा फ्रेंड्स फाऊंडेशनच्या या उपक्रमातून मानवतेचा संदेश देतानाच रक्तदानाचे मह

त्त्वही अधोरेखित झाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow