बीओटी तत्त्वावरील प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करा...!

 0
बीओटी तत्त्वावरील प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करा...!

बीओटी तत्त्वावरील प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करा;...

महापौर, उप महापौर, स्थायी समिती सभापती यांचे निर्देश...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - शहरातील औरंगपूरा येथील बीओटी (BOT) तत्त्वावर उभारण्यात येत असलेल्या भाजी मंडई व वसंत भवन या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना माननीय महापौर समीर राजूरकर आणि स्थायी समिती सभापती श्री अनिल मकरीये यांनी दिल्या.

आज दि. 13 एप्रिल रोजी महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये तसेच महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संभाजी पेठ येथील बीओटी तत्त्वावरील भाजी मंडई व वसंत भवन प्रकल्पांची संयुक्त पाहणी केली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना भाजी मंडईतील ओटे तातडीने पूर्ण करण्याच्या तसेच वसंत भवन येथील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण झाल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.

यानंतर महापौर, स्थायी समिती सभापती, आयुक्त तसेच उपमहापौर श्री राजेंद्र जंजाळ यांनी सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयातील बीओटी प्रकल्पाची संयुक्त पाहणी केली. यावेळी महापालिकेच्या हिस्स्यातील गाडे/कंपोनंट तातडीने ताब्यात घेऊन ते कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून उत्पन्नात वाढ होईल.

पाहणीदरम्यान महापौरांनी उद्यान व प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सातारा व जळगाव येथून आलेल्या पर्यटकांनी उद्यानाबाबत समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त अपर्णा थेटे, मुख्य उद्यान अधिकारी डॉ. विजय पाटील, उपायुक्त सविता सोनवणे, कार्यकारी अभियंता वसंत भोय, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाहेद शेख, सहाय्यक आयुक्त रमेश मोरे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow