"रस्ता रुंदीकरण थांबवून मोफत सार्वजनिक वाहतूक द्या" भाकपाचे लोकाभिमुख निवेदन...

"रस्ता रुंदीकरण थांबवून मोफत सार्वजनिक वाहतूक द्या!" – भाकपचे लोकाभिमुख निवेदन आयुक्तांकडे सादर
चर्चेसाठी वेळ मागीतली... !
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7 (डि-24 न्यूज) - महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक यांना शहरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या योजनांमुळे होणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व पर्यावरणीय नुकसानीकडे लक्ष वेधून घेतले गेले असून, त्याऐवजी मोफत सार्वजनिक वाहतूक सेवा राबवावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे
रस्ता रुंदीकरण थांबवावे – यामुळे नागरिकांची घरे, मंदिरे, मशिदी, दुकाने, स्मशाने उद्ध्वस्त होत असून ऐतिहासिक वारसा नष्ट होतो आहे.
शहराला "हेरिटेज सिटी" घोषित करावे – शहराचा ऐतिहासिक वारसा आणि 52 दरवाजांची रचना ही शहराची ओळख आहे.
मोफत सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करावी –
सरकारने नवीन बस खरेदी करण्याऐवजी विद्यमान ऑटो रिक्षा चालकांना करारावर कामावर घ्यावे.
त्यांना रोज ₹६०० मानधन अथवा त्यांना जे मान्य होईल ते दिल्यास, ते मोफत प्रवासी सेवा पुरवू शकतात.
यामुळे वाहनांची संख्या, प्रदूषण, आणि ट्राफिक कमी होईल.
वाहनांची वाढ आणि दुष्टचक्र थांबवावे –
शहरात सध्या 10.5. लाखांहून अधिक खाजगी वाहने आहेत.
दरवर्षी 7-8% वाढ
त्यामुळे: वाहने वाढ → रस्ता वाढवणे → पुन्हा वाहने वाढ
प्रदूषणाचा मुद्दा –
PM 2.5 आणि ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण WHO मानकांपेक्षा अधिक.
झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल, उष्णतेत वाढ
मेलबर्न मॉडेलचा अवलंब करावा –
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात मोफत व उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक योजनेमुळे खाजगी वाहनांची गरजच उरत नाही.
आर्थिक व पर्यावरणीय तुलनात्मक माहिती:
पर्याय खर्च / परिणाम
1 किमी रस्ता रुंदीकरण ₹15–20 कोटी (तोडफोड, बांधकाम)
100 बस खरेदी ₹70–90 कोटी
1000 ऑटो चालकांचे मानधन (1 वर्ष) ₹22 कोटी (₹600 × 30 × 12 × 1000)
प्रदूषणाचा परिणाम श्वसन रोग, उष्णतेत वाढ, झाडांची कत्तल
या मागण्या शहराच्या पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित करणाऱ्या आहेत.
भाकपने स्पष्ट केले की रस्ता रुंदीकरण हा केवळ "देखावा विकास" असून त्यामागे वास्तव, विज्ञान व लोकजीवनाचा विचार नाही. या ऐवजी, मोफत व प्रभावी सार्वजनिक वाहतूक हीच टिकाऊ, स्वस्त व मानवीय योजना ठरू शकते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मत:
> "शहराचे सौंदर्य त्याच्या जुन्या रचनेत आहे. ते पाडून नव्या सिमेंटच्या भिंती उभारणे म्हणजे शहराला ओळख नष्ट करणे आहे. सरकारने आमचा आवाज ऐकावा."
> "मोफत ऑटो सेवा आणि बस सुविधा दिल्यास कोणालाही स्कूटर घेण्याची गरजच भासणार नाही. रस्ता आपोआप मोकळा होईल."यापूर्वीही ट्राफिक मुळे पीर बाजार बंद करण्यात आला होता त्यावेळी देखील आयुक्तांना आम्ही हा पर्याय सुचवला होता. आयुक्तांनी चर्चा करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यावर अधिक चांगले काम करता येईल परंतु जसे आयुक्त किंवा सरकारने हा पर्याय स्वीकारण्याची गरज आहे त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनी देखील या पर्यायाला पाठिंबा देण्याची गरज आहे शहरातील नागरिक या पर्यायाच्या पाठीशी उभे राहिले तर आपले छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद शहर जगातील आनंदी ,सुदृढ ,पर्यावरण प्रेमी, रोजगाराभिमुख असे आदर्श शहर ठरू शकते. या पत्रकार परिषदेला
अँड. अभय टाकसाळ,
राज्य कौन्सिल सदस्य, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
काॅ. जॅक्सन फर्नांडिस,
शहर सह सेक्रेटरी
काॅ. अनिता हिवराळे,
शहर सह सेक्रेटरी
काॅ. विकास गायकवाड,
जिल्हा कार्यकारिणी सदस्य, भाकप
काॅ.. रफिक बक्ष,
जिल्हा कौन्सिल सदस्य
काॅ. राजू हिवराळे,
जिल्हा कौन्सिल सदस्य
एजाज शेख,
यांनी संबोधित केले.
What's Your Reaction?






