मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय पाडण्याची नोटीस बेकायदेशीर - समीर साजिद बिल्डर
मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय पाडण्याची नोटीस बेकायदेशीर - समीर साजिद बिल्डर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी नीदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतीन पटेल यांनी ज्या घरात नीदा खानला आश्रय दिला तो घर आणि कार्यालय हे अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस महापालिका प्रशासनाने बजावली आहे. कागदपत्रे सादर करुन आपले म्हणण्याची तीन दिवसांची मुदत दिली होती. उत्तर दिले नाही तर कारवाई करण्याचा इशारा नोटीस मध्ये देण्यात आला होता. मतीन पटेल यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महापालिका प्रशासनाला कागदपत्रे सादर केली व पंधरा दिवसांची मुदत मागितली आहे. न्यायालयातही धाव घेतली असून 15 दिवसांची मुदत मागितलेली आहे. कुटुंबाने म्हटले आहे हि नोटीस बेकायदेशीर आहे.
विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनीही सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने मतीन पटेल यांना दोषी ठरवले नाही. पोलिस तपास करत आहेत. महापौर घर पाडणार व पदही रद्द करणार असल्याचे वक्तव्य करत आहे. हुकुमशाही चालणार नाही तुम्ही न्यायालय आहेत का...? न्यायालयाचा निर्णय येवू द्या. सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईननुसार अनधिकृत बांधकाम पाडायचे असल्यास 15 दिवसांची मुदत दिली जाते परंतु महापालिका प्रशासनाने तीन दिवसांची मुदत दिल्याने हि नोटीस बेकायदेशीर असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. महापालिकेच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नियमानुसार कोणत्याही कार्यवाही पूर्वी 15 दिवसांचा अवधी देणे बंधनकारक असताना केवळ तीनच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मतीन पटेल यांच्यावर अद्यापपर्यंत कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. ज्या मालमत्तेवर कारवाई केली जात आहे ती त्यांच्या मालकीची नसल्याचा दावा समीर साजिद बिल्डर यांनी केला आहे.
नाशिक धर्मांतरण प्रकरणात गुन्हा दाखल झालेले नगरसेवक मतीन पटेल यांनी महापालिकेच्या अतिक्रमण नोटीस विरोधात न्यायालयात धाव घेतली असून महापालिकेने दिलेली तीन दिवसांची नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे. आपली कागदपत्रे आणि सविस्तर उत्तर सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली आहे. महापालिकेचा बुलडोझर चालण्याच्या अगोदर मतीन पटेल यांनी न्यायालयाच्या प्रक्रीयेचा आधार घेतल्याने न्यायालयात काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आ
हे.
What's Your Reaction?