साखरेच्या वाढत्या दराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन...!

 0
साखरेच्या वाढत्या दराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन...!

साखरेच्या वाढत्या दराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; सहकार मंत्र्यांना पाठवला रिकामा चहाचा कप आणि १ किलो साखर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- साखरेच्या वाढत्या दराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. सिडको पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना रिकामा चहाचा कप आणि एक किलो साखर पार्सल पोस्टाने पाठवण्यात आली. साखरेचे वाढते दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वाढत्या दरावर तातडीने नियंत्रण आणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात प्रदेश सचिव आनंद मगरे, शारुख शेख, तारेख पठाण, प्रकाश इंगळे, आशिष इंगळे, उदय बनसोडे, कुलदीप शिंदे, हर्षल निकम, सिद्धांत गुटिकर, सुरेश दाभाडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow