अब्दीमंडी येथील शत्रुसंपत्ती घेतली ताब्यात, अपर तहसीलदारांनी लावला बोर्ड
 
                                अब्दीमंडी येथील शत्रुसंपत्ती घेतली ताब्यात, अपर तहसीलदारांनी लावला बोर्ड
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) अब्दीमंडी येथील शत्रुसंपत्तीवर बोर्ड लाऊन जमीन ताब्यात घेतल्याची कारवाई अपर तहसीलदार यांनी केली आहे. कटकट गेट येथेही शत्रुसंपत्ती आहे पण हा वाद न्यायालयात सुरू आहे.
जाहीर सूचना व नोटीस...
मौजे अब्दीमंडी येथील गट नं.11,12,26,37, व 42 ची सदरील शेतजमीन ही शत्रु संपत्ती (E.P) PROPERTY असून या सदरील जमीनीचा ताबा देखील ASSISTANT CUSTODIAN तथा अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) यांचा आहे. सदरील जमीनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आदेशावरून, अपर तहसीलदार, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) असे या जमीनीवर लावलेल्या लोखंडी बोर्डावर लिहिले आहे. या जमिनीवर बोर्ड लावल्याने भुमाफीयांचे धाबे दणाणले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            