ईद-उल-अजहा निमित्ताने शहरात अतिरिक्त पाणी पुरवठा व विशेष स्वच्छतेची मागणी...
सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) औरंगाबाद तर्फे ईद-उल-अजहा निमित्त शहरात अतिरिक्त पाणीपुरवठा व विशेष स्वच्छता व्यवस्थेची मागणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI)चे जिल्हाध्यक्ष समीर शाह अहमद यांनी आगामी ईद-उल-अजहा (बकरा ईद) निमित्त शहरात अतिरिक्त व पुरेसा पाणीपुरवठा तसेच विशेष स्वच्छता व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसंत भुये यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ईद-उल-अजहाच्या काळात धार्मिक कार्ये, स्वच्छता आणि इतर आवश्यक कारणांमुळे पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे दि.27 मे 2026 आणि 28 मे 2026 रोजी शहरातील सर्व भागांमध्ये, विशेषतः मुस्लिम बहुल परिसरात नियमित व अतिरिक्त पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी.
तसेच ईदच्या दिवसांमध्ये शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन महानगरपालिका प्रशासनाने योग्य साफसफाई व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
कार्यकारी अभियंता वसंत भुये यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रतिनिधीमंडळाला आश्वासन दिले की, ईद-उल-अजहा निमित्त शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी रियाज़ सौदागर, आरेफ शाह, सलमान शेख, शफीउल्लाह खान आणि समीर पटेल उपस्थित होते.
What's Your Reaction?