ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त शहरात 5 हजार शितपेय वाटपाचा विक्रम...!

 0
ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त शहरात 5 हजार शितपेय वाटपाचा विक्रम...!

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त 5 हजार शीतपेय वाटपाचा विक्रम...

I Love Aurangabad Foundation चा स्तुत्य उपक्रम; पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते उद्घाटन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26 (डि-24 न्यूज) :- ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही बंधुभावाचा संदेश देण्यासाठी निजामुद्दीन चौक, शहागंज येथून भव्य जुलूस-ए-मोहंमदीचे आयोजन करण्यात आले होते. भोजनदान, पाणी व शरबत वाटप, थंड शितपेय वाटप, रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे आयोजन शहरात करण्यात आले होते. या जुलूसमध्ये पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जुलूसमध्ये सहभागी होणारे भाविक शहरातील विविध भागांतून सुमारे 10 ते 15 किलोमीटर पायी प्रवास करतात. त्यामुळे भाविकांची तहान भागविण्यासाठी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या I Love Aurangabad Foundationच्या वतीने जुना बाजार येथे तब्बल 5 हजार शीतपेयांचे वाटप करण्याचा विक्रम केला. 

फाऊंडेशनचे अध्यक्ष इरबाज अन्सारी यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या शीतपेय वाटपाचा शुभारंभ पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देत युवकांनी नशेपासून दूर राहून शिक्षणाकडे वळावे, असा महत्त्वपूर्ण संदेश दिला. समाजातील युवकांनी शिक्षण, प्रगती आणि सकारात्मक कार्याला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी उर्दू दैनिक हिंदुस्थानचे संपादक नायाब अन्सारी, नगरसेवक नवीन ओबेरॉय, डीसीपी पंकज अतुलकर, एसीपी सागर देशमुख, एसीपी साईनाथ ठोंबरे, सिटी चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती निर्मला परदेशी, नजीब खान, ताआमिरे मिल्लत ग्रुपचे अब्दुल मोहिद हशर, मलिक हशर, नवेरा हशर, डॉ. शादाब शेख, मनाल काझी, मिर्झा अफसर यांच्यासह I Love Aurangabad Foundationचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow