ईव्ही कार खरेदीच्या निषेधार्थ एमआयएमची गांधीगिरी, सायकलवर बसुन मनपात दाखल नगरसेवक...!

 0
ईव्ही कार खरेदीच्या निषेधार्थ एमआयएमची गांधीगिरी, सायकलवर बसुन मनपात दाखल नगरसेवक...!

ईव्ही कार खरेदीच्या निषेधार्थ एमआयएमची गांधीगिरी, सायकलवर बसुन मनपात दाखल...!

बुढीलेन दारुस्सलाम ते मनपा पर्यंत उन्हात डोक्यावर टोपी घालून सायकलवर नगरसेवकांनी केला प्रवास...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन बचत करण्याचे आवाहन केले होते. याचा परिणाम महापालिकेत दिसून येत आहे. स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी इंधन बचतीसाठी ईव्ही कारची खरेदी केली. बुढीलेन दारुस्सलाम ते मनपा पर्यंत उन्हात डोक्यावर टोपी घालून सायकलवर बसुन एमआयएम नगरसेवकांनी गांधीगिरी करत  महापालिका मुख्यालयात सकाळी 11 वाजता दाखल झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बसमध्ये प्रवास करत आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुलेट वर बसून मंत्रालयात येत आहे परंतु सत्ताधारी पक्षाचे मनपाचे पदाधिकारी नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशातून कोट्यवधींची ईव्ही कारची खरेदी करून पैशांचा चुराडा करत आहे.

कराच्या पैशातून रुग्णालय बनवा, सरकारी शाळा बनवा, शहरातील नागरिकांना पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे असे ज्वलंत प्रश्न सोडून लक्झरीयस लाईफ जगण्यासाठी मनपाचे सत्ताधारी पैशांचा अपव्यय करत असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी केला. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये व मनपा आयुक्त अमोल येडगे यांना एमआयएमच्या नगरसेवकांनी सायकल भेट देऊन महापालिकेत येताना याचा वापर करण्याचा सल्ला दिला.

याप्रसंगी गटनेते हाजी शेरखान व सर्व नगरसेवक उपस्थित होते.‌

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow