औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट विजयी....!
औरंगाबाद - जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी
छत्रपती संभाजीनगर, दि.22(डि-24 न्यूज)- विधानपरिषदेच्या औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट हे विजयी झाले आहेत. त्यांना 455 मते प्राप्त झाले आहेत. या निवडणुकीत तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 135 मते प्राप्त झाली असून अपक्ष उमेदवार इसाक खान सांडू खान यांना 35 मते प्राप्त झाली. पाच मते अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी निकाल जाहीर केला
What's Your Reaction?