औषधीभवन लगतच्या नाल्याची पाहणी, समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे आदेश...!

 0
औषधीभवन लगतच्या नाल्याची पाहणी, समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे आदेश...!

औषधी भवन लगतच्या नाल्याची महापौर, स्थायी समिती सभापती व आयुक्तांकडून संयुक्त पाहणी...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- शहरातील औषधी भवन लगतच्या नाल्याच्या समस्येची गंभीर दखल घेत आज महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित ठिकाणी संयुक्त पाहणी केली.

स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांनी या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर ही संयुक्त पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान औषधी भवन इमारतीची उंची कमी असल्यामुळे नाल्याच्या साफसफाईच्या कामात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. नाल्यात जेसीबी यंत्र उतरविण्यास पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नियमित साफसफाई करणे कठीण होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

याशिवाय, या नाल्यात सुमारे 250 घरांचे सांडपाणी (ड्रेनेज) सोडण्यात येत असल्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसात नाल्याचे पाणी अनेक घरांमध्ये शिरून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावर संबंधित घरांचे ड्रेनेज मुख्य ड्रेनेज लाइनला जोडण्याचे सूचना करण्यात आली.

पाहणीदरम्यान महापौर, स्थायी समिती सभापती आणि आयुक्त यांनी औषधी भवन परिसरात नाल्यात प्लास्टिक व थर्माकोल जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी बॅरियर उभारण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच, औषधी भवन इमारतीची लीज (Lease) मुदत संपलेली आहे अथवा नाही, याची तातडीने तपासणी करून त्यानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी यावेळी दिले. तसेच या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow