कटकट गेट मध्ये युवकाने केली आत्महत्या...!
कटकट गेट मध्ये युवकाने केली आत्महत्या...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.22(डि-24 न्यूज) आज दुपारी कटकट गेट, नेहरुनगर डिपीजवळ अब्दुल आबीद अब्दुल हमीद, वय 38, धंदा ड्रायव्हर, या युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. शवविच्छेदनासाठी शव घाटीत दाखल आहे. आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही.
आबीदच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, चार मुली आहेत. आबीदच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली आहे आहे.
What's Your Reaction?