ख्वाजा गरीब नवाज रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक शिबिराचे भव्य शुभारंभ, 12 महीलांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया...!

 0
ख्वाजा गरीब नवाज रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक शिबिराचे भव्य शुभारंभ, 12 महीलांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया...!

ख्वाजा गरीब नवाज रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक शिबिराचा भव्य शुभारंभ...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- प्रभाग क्रमांक 12, नेहरुनगर येथील महापालिकेच्या ख्वाजा गरीब नवाज(KGN) रुग्णालयात आज महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते मोफत लॅप्रोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया या आधुनिक, सुरक्षित व असलेल्या शिबिराचे भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून महापौरांनी शिबिराचे उद्घाटन केले.

याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समीती सभापती डॉ.सुनीता साळुंके, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडालेचा, एमआयएमचे गटनेते हाजी शेरखान, नगरसेविका श्रीमती सुमय्या निसार खान, नर्गिस सय्यद सलिम, वाजेद जगिरदार, श्रीमती फरहत जहाँ अतिक पालोदकर, डॉ.गोविंद नरवने, डॉ.शिरसाट, डॉ.दवंडे, डॉ.कल्पना राठोड, डॉ.सुरज जाधवर, डॉ.सचिन पालवे, असिस्टंट मॅट्रन श्रीमती मीनल ठोकळ, श्रीमती सुनंदा साठे, संतोष तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये 12 महीलांवर यशस्वीपणे मोफत लॅप्रोस्कोपिक स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आतापर्यंत महापालिकेच्या विविध रुग्णालयात मोफत लॅप्रोस्कोपिक शिबिरांच्या माध्यमातून 269 महीलांवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आले आहे. मोफत लॅप्रोस्कोपिक दुर्बिणीद्वारे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया या आधुनिक, सुरक्षित व अल्पकालीन विश्रांतीची आवश्यकता असलेल्या पध्दती असून महिलांसाठी वेदना मुक्त व जलद आरोग्य लाभ देणा-या ठरत आहे. या शस्त्रक्रियांमुळे महिलांच्या आरोग्याबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक स्थैर्यालाही बळकटी मिळत आहे.

यापुढेही मनपाच्या सहा रुग्णालयांमधून सिडको एन-8, सिडको एन- 11, सिल्क मिल काॅलनी, कैसर काॅलनी, नेहरु नगर, मेल्ट्राॅन रुग्णालय येथे नियमितपणे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow