डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत सेना महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत सेना महाराज,व महात्मा फुले यांना माणुसकी वृद्ध सेवालय येथे अभिवादन....
बहुजन नायक उत्सव समिती कडून जयंती सप्ताह उत्साहात साजरा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- बहुजन नायक उत्सव सोहळा समिती व सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने माणुसकी वृद्ध सेवालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत सेना महाराज जयंती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा जोतिबा फुले जयंती सप्ताह विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने माणुसकी वृद्ध सेवालय येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.रामेश्वर राऊत होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राहुल साळवे, अशोक गायकवाड उपस्थित होते. सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुमित पंडित यांनी संत सेना महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.रामेश्वर राऊत यांनी तिन्ही महान व्यक्तींच्या कार्याचा व विचारांचा सखोल आढावा घेतला. त्यांनी सांगितले की,या महामानवांनी समाजात समता, शिक्षण व मानवतेचे मूल्य रुजवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते आपल्या आचरणात उतरवणे हीच खरी श्रद्धांजली आहे. शिक्षण, सामाजिक जागृती व बंधुता या तत्त्वांवर चालल्यास समाज अधिक प्रगत व सशक्त होईल, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास प्रा.शरद सोनवणे, समाजसेविका पूजा सुमित पंडित, लक्ष्मी पंडित, राम पंडित तसेच माणुसकी समूहाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून या महान व्यक्तींना अभिवादन करण्यात आले.
What's Your Reaction?