तयारी मनपा निवडणुकीची, प्रभागरचना निमित्त प्रशासकांची पाहणी...
 
                                प्रभागरचना निमित्त प्रशासकांची पाहणी...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि. 20(डि-24 न्यूज)
स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकीचा हालचाली सुरू झाली असून छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेने प्रभाग रचनेस सुरुवात केली आहे.
ही प्रभाग रचना अंतिम करून ती निवडणूक आयोगाकडे 08 जुलै पर्यंत पाठवायची आहे. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी उस्मानपुरा भागात आज पाहणी केली. प्रभाग रचनेचा काम गोपनीय समितीमार्फत होणार आहे. यावेळी समितीचे सदस्य उपस्थित होते.
शहराच्या उत्तर ते दक्षिण या दिशेने प्रभाग तयार केले जाणार असल्याने हर्सूल ते नक्षत्रवाडी अशा पद्धतीने प्रभाग होणार आहेत.
सदरील कामास सुरुवात झाली असून यानिमित्ताने प्रशासक महोदयांनी पाहणी केली.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            