पोलिस उपनिरीक्षक नजीर शेख यांना राष्ट्रपती पदक...!

 0
पोलिस उपनिरीक्षक नजीर शेख यांना राष्ट्रपती पदक...!

पोलिस उपनिरीक्षक नजीर शेख यांना राष्ट्रपती पदक...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) औरंगाबाद ग्रामीण सिल्लेगाव पोलिस ठाणे पोलीस उपनिरीक्षक नजीर नसीर शेख यांना राष्ट्रपती पदक गुणवत्ता पूर्ण सेवेबद्दल प्राप्त झाले आहे. उद्या सकाळी देवगिरी मैदानावर त्यांना हे पदक पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पोलिस दलात बजावलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना हे पदक मिळाले आहे.

त्यांची पोलिस दलात कारकीर्द बघितली तर जालना जिल्हा पोलिस दलात 14/2/1985 साली भरती झाले. सन 2015 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. 39 वर्ष त्यांची सेवा झाली आहे. जवळपास 300 बक्षिसे या कालावधीत मिळाली. पोलिस ठाणे पारध, टेंभुर्णी, अंबड एन्टी करप्शन ब्युरो जालना तालूका चंदनझिरा, जालना वाहतूक शाखा व औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील पोलिस ठाणे येथे नोकरी केली आहे. सन 2021 मध्ये जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून सर्व आरोपी अटक केली. गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला. सन 2022 मध्ये दरोड्याच्या गुन्ह्यात सात आरोपी अटक करुन मुद्देमाल जप्त केला. सन 2024 मध्ये अनोळखी मयताची ओळख पटवून दोन तासांच्या आत आरोपीला अटक केली. दोषारोपपत्र न्यायालयात पाठवले असून सदरचा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. राष्ट्रपती पदक मिळाल्याने त्यांचे पोलिस दलात अभिनंदन केले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow