घाटीतील कंत्राटी कामगारांचे वेतन थकले, आंदोलक महीलेची तब्येत बिघडली...

घाटीतील कंत्राटी कामगारांचे वेतन थकले, आंदोलक महीलेची तब्येत बिघडली...
अधिष्ठातांच्या अरेरावीला आयटकचे संयमाने उत्तर... !
सेवेत सामावून घेण्यासाठी तीव्र निदर्शने... !
छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) दि.20(डि-24 न्यूज)
थकीत वेतन व विविध मागणीसाठी घाटीतील कंत्राटी कामगारांनी आंदोलन केले. अधिष्ठातांना निवेदन देत असताना सुरक्षा गार्डनी धक्काबुक्की केल्याने एका महीला आंदोलकाची तब्येत बिघडली असल्याची माहिती एड अभय टाकसाळ यांनी दिली. कोविड काळात उत्कृष्ट सेवा दिलेल्या कोविड योद्धांना सेवेत सांभाळून घ्या, उर्वरित 2000 जागांसाठी भर्ती करा या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे घाटी रुग्णालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे निवेदन स्वीकारत नव्हते चर्चा करत नव्हते , सुरक्षारक्षकांना अंगावर घालून धक्काबुक्की केली दरम्यान सविता संतोष घागरे, वय 32 वर्ष या कोविड कर्मचारी छातीत दुखू लागल्याने जागीच कोसळल्या बेशुद्ध पडल्या त्यांना छातीत दुखायला लागले. त्यामुळे त्यांना अपघात विभागात तातडीने उपचारासाठी दाखल करावे लागले. दरम्यान एसीपी शिंदे यांनी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची समजूत काढली व निवेदन स्वीकारून चर्चा करावयाची विनंती केली, त्यानंतर पाच जणांचे शिष्टमंडळ गेले एड अभय टाकसाळ यांनी कोविडयोध्दांची बाजू मांडली व महिनाभर काम केल्यानंतर वेळेवर पगार मिळत नाही किराणा सामान, घर भाडे, मुलांचे खर्च हे कसा द्यावा असा प्रश्न केला, डॉ. शिवाजी सुक्रे यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. परंतु न्याय मागण्यासाठी युनियन संघर्ष सुरूच ठेवणार असे निरीक्षण सांगण्यात आले.
What's Your Reaction?






