पदवीधर निवडणुक, छाननीत किती उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध वाचा हि बातमी

 0
पदवीधर निवडणुक, छाननीत किती उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध वाचा हि बातमी

5 - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक

छाननीअंती 54 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)- 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 साठी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 7 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. छाननीअंती 54 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत.

निवडणूक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या वैध उमेदवारांच्या यादीत अनुक्रमांक 1 ते 54 अशा एकूण 54 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. 

दि. 9 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार असून, 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow