मनपाच्या सीबीएसई शाळेत प्रवेशासाठी वेटींग...
 
                                 
मनपा सी बी एस इ ज्युनिअर केजी प्रवेशास उदंड प्रतिसाद...
526 प्रवेश फॉर्म वितरित
उद्या सुद्धा प्रवेश फार्मचे वितरण...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने
शहरामध्ये सीबीएसईच्या एकूण सहा शाळा सुरू आहेत.
ज्युनिअर केजी या वर्गाच्या प्रवेशासाठी आजपासून प्रवेश फॉर्म वितरण करण्यात येत आहेत. उद्या 24/6/2025 रोजी देखील प्रवेश फॉर्म वितरीत करण्यात येणार आहे.
आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या योजनेअंतर्गत मनपाच्या सीबीएसई शाळा सुरू आहे. उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून ज्युनिअर के.जी. या वर्गाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
आज सीबीएसई गारखेडा या शाळेत 73, सीबीएसई उस्मानपुरा 117, सीबीएसई प्रियदर्शनी 43, सीबीएसई सिडको एन-11 - 48, सीबीएसई सिडको एन-7 44
, सीबीएसई चेलीपुरा 201 ,
एकूण सर्व शाळांमधून 526 फॉर्म वितरण झाले आहे.
या प्रत्येक शाळेमध्ये एकूण प्रत्येकी 40 विद्यार्थी लकी ड्रॉ पद्धतीने प्रवेशित करण्यात येणार आहे. अशी माहिती सीबीएसई समन्वयक शशिकांत उबाळे यांनी दिली.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            