मुकुंदवाडीत राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा ताफा अडवला....

मुकुंदवाडीत राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा ताफा अडवला....इम्तियाज जलिल भेटायला गेले तेव्हा गर्दी उसळली...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) दुपारी चार ते पाच वाजेदरम्यान चिकलठाणा विमानतळावरुन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा पोलिसांच्या बंदोबस्तात येताना मुकुंदवाडीत घोषणाबाजी करत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी रविवारी मुकुंदवाडी ते चिकलठाणा पर्यंत पाडापाडीची पाहणी केली नागरीकांशी चर्चा केली म्हणून गर्दी जमली होती याचवेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा जात असताना जमावाने ताफा अडवण्याचा प्रयत्न केला व घोषणाबाजी केली. गाडी थांबवून बागडेंना लोकांची व्यथा ऐकूण घ्यावी अशी अपेक्षा होती. पोलिसांनी जमावाला बाजूला करत सुरक्षित राज्यपालांचा ताफा पुढे सरकवला. दोन दिवस अगोदर मुकुंदवाडी येथील शेकडो अतिक्रमण काढल्यानंतर येथील लोक संतप्त झाले आहे. शेकडो लोकांचा रोजगार बुडाला व बेघर झालेले लोक रस्त्यावर आले आहे यामुळे सरकारवर येथील नागरीकांची नाराजी असल्याने आपल्या भावना बागडेंनी ऐकून घ्यावी अशी मागणी जमावाची होती. काही मिनिटांत त्यांचा ताफा शहराकडे वळाला.
What's Your Reaction?






