उध्दव ठाकरे - इम्तियाज जलील यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा, काय आहे नेमके कारण वाचा...!

 0
उध्दव ठाकरे - इम्तियाज जलील यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा, काय आहे नेमके कारण वाचा...!

उध्दव ठाकरे - इम्तियाज जलील यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा, काय आहे नेमके कारण वाचा...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. हि काही राजकीय भेट तर नाही ना असे वाटले होते परंतु या चर्चेला विराम देण्यासाठी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांना माध्यमांसमोर यावे लागले. काही दिवस अगोदर ईदनिमित्त इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी शिरखुर्माचा अस्वाद घेण्यासाठी अंबादास दानवे गेले होते त्यानंतर राजकारणात तापले होते तसेच आजही मातोश्रीवर इम्तियाज जलील गेल्यानंतर घडले. इम्तियाज जलील यांचे सुपुत्र बिलाल जलिल यांचे या महीन्यात शूभविवाह आहे यामुळे लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ते आज मातोश्रीवर दाखल झाले यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow