रांजणगाव शेणपुंजी एमआयडिसीत डिएमजी फार्माचे शानदार उद्घाटन, दानिश देशमुख यांना दिल्या शुभेच्छा...

 0
रांजणगाव शेणपुंजी एमआयडिसीत डिएमजी फार्माचे शानदार उद्घाटन, दानिश देशमुख यांना दिल्या शुभेच्छा...

रांजणगाव शेणपुंजी एमआयडिसीत डिएमजी फार्माचे शानदार उद्घाटन, कामगार वस्तीतल्या नागरीकांना दिलासा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) - धावपळीच्या जीवनात दगदग यामुळेच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेळेची कमी यामुळे अनेक आजार शरीरात पसरण्याचा धोका... यासाठी व्यायाम व फॅमिली डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घेणे आवश्यक आहे. शुगर, बीपी, वजन वाढणे, किडनीचे आजार, कॅन्सर, गुडघेदुखी, पोटाचे विकार व विविध आजारांवर उपाय म्हणजे वेळोवेळी तपासणी व औषधोपचार यासाठी रांजणगाव शेणपुंजी एमआयडिसीत आज प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून डिएमजी फार्माचे शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी मालक दानिश देशमुख व त्यांचे वडील ताहेर देशमुख यांनी शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक व गावातील प्रतिष्ठित नागरीकांनी उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. दानिशने याप्रसंगी सांगितले आम्हाला रुग्णांची सेवा करायची आहे त्यांना सर्व प्रकारच्या औषधी डिस्काउंट रेटमध्ये होलसेल एण्ड रिटेल दरात मिळतील. परिसरातील औषधी मेडीकल हे सुद्धा आमच्याकडे होलसेल दरात औषधी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकदा अवश्य भेट द्या व अनुभव घ्यावे असे आवाहन ग्राहकांना त्यांनी केले आहे. नामांकित कंपन्यांच्या हॉलोपॅथी, सर्जीकल, आयुर्वेदिक औषधी डिस्काउंट रेटमध्ये मिळतील. बाजारपेठेत हे औषधांचे मोठे दालन उभे केले आहे. याचा रुग्णांनी लाभ घ्यावा. परिसरातील सर्व खाजगी रुग्णालयात लागणारी औषधे आमच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही औषधी उपलब्ध नसली तरी त्वरित मागवून दिली जाईल. असे आवाहन दानिशने केले आहे.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, ताहेर देशमुख, रऊफ देशमुख, गणी देशमुख, करीम देशमुख, अजीम देशमुख, डॉ.अहेमद शरीफ देशमुख, फारुख देशमुख, मजीतुल्लाह, डॉ.जुनेद देशमुख, सईद देशमुख, अश्फाक खान, शमीम भाई, अखलाक देशमुख, रफीक भाई, बाबा भाई, फुजल पठाण आदी उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow