रोडरोमिओंवर ग्रामीण पोलिसांचा धडक प्रहार, शाळा महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाऱ्या 32 जणांवर कारवाई
“ऑल आऊट ऑपरेशन” अंतर्गत रोडरोमिओंवर ग्रामीण पोलिसांचा धडक प्रहार; शाळा-महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाऱ्या 32 जणांवर कारवाई…
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 3/8/26 ते दि. 4/8/26 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात विशेष “ऑल आऊट ऑपरेशन” प्रभावीपणे राबविण्यात आले. या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके तसेच महिला व मुलींची वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा होता. मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व अंमलदारांनी शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष गस्त घालून महिला व विद्यार्थिनींना त्रास देणारे, टवाळखोरी करणारे, पाठलाग करणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्या रोडरोमियो विरुद्ध विशेष मोहीम राबविली.
या कारवाईत शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाऱ्या एकूण 32 व्यक्तींविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमातील कलम 110 व 117 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेबरोबरच अवैध धंदे, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या व्यक्ती तसेच विविध प्रतिबंधात्मक कारवायांवरही विशेष भर देण्यात आला. जिल्हाभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
ऑपरेशनची ठळक आकडेवारी
दारूबंदी कायद्यान्वये प्रभावी कारवाई …
अवैधरित्या व चोरटया मार्गाने दारु विक्री बाबत 55 गुन्हे दाखल करण्यात आले असून 57 आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी विदेशी दारू बाटल्या जप्त करण्यात आल्या तसेच गावठी हातभट्टी दारु व रसायन, ड्रम, दारु साठविण्याचे साहित्य,हस्तगत करून नाश करण्यात या संपुर्ण कारवाईत एकुण 3,92,680/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी विरुध्द महाराष्ट्र प्रोव्हीबिशन कायदा कलमानुसार जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
दारूबंदी प्रतिबंधात्मक कारवाई
कलम 85[1] अन्वये 8 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या.
तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणा-यावर कोटपा (COTPA) अंतर्गत कारवाई
शाळा, महाविद्यालय यांचे परिसरात अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणा-या व्यक्ती विरोधात 58 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचेवर कलम 6(ब) 24, सिगारेट व अन्य विक्री उत्पादने अधिनियम अन्वये 58 आरोपींवर कारवाई करण्यात आली 19647 इतका दंड वसूल.
एकूण कारवाईचा तपशील
एकूण गुन्हे : 113 एकूण आरोपी : 147 एकूण जप्त मुद्देमाल : 4,12,327/-
पोलीस अधीक्षकांचे आवाहन
पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, महिला, मुली व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या, छेडछाड करणाऱ्या तसेच अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यास किंवा पोलीस नियंत्रण कक्षास द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात
येईल.
What's Your Reaction?