ज्या पोलिस ठाण्यात नोकरी त्याच पोलिस ठाण्याची सहायक फौजदाराने केली लाखो रुपयांची फसवणूक

 0
ज्या पोलिस ठाण्यात नोकरी त्याच पोलिस ठाण्याची सहायक फौजदाराने केली लाखो रुपयांची फसवणूक

ज्या पोलिस ठाण्यात नोकरी तेथे केली तीन लाखांची फसवणूक, सहायक फौजदारावर गुन्हा दाखल...! 

पोलिस ठाण्याच्या बँक खात्यातुन मोहरील परस्पर काढले 3 लाख

छावणीचे सहायक फौजदार गायकवाड यांच्याकडून अपहार

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) शासकीय बँक खात्याची जबाबदारी असलेल्या मोहरील पदावर तैनात असलेल्या सहाय्यक फौजदाराने तत्कालीन पोलिस निरीक्षकाचा विश्‍वास संपादन करून खात्यातील 3 लाख 4 हजार रूपये परस्पर काढून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्या रामदास संताराम गायकवाड (वय 54) असे सहाय्यक फौजदारचे नाव आहे.

पोलिस निरीक्षक डॉ. राजेंद्र नारायण होळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामदास संताराम गायकवाड हे छावणी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. गायकवाड यांच्याकडे पोलिसांचा तपास फंड, पोलिस मेंटेनन्स, वीज बील अशा कामाचा हिशोब त्यांच्याकडे होता. त्यामळे हा पदभार सांभाळणार्‍या कर्मचार्‍याला मोहरील म्हणतात. गायकवाड यांनी 30 एप्रिल 2021 पासून एसबीआय बँक खात्यातून शासकीय निधी काढून घेतला. निधीची नोंद पोलिस ठाण्यात न करता परस्पर रकम हडप केली. सहायक फौजदाराने शासनाची दिशाभूल करुन फसवणूक केली.

शाकसकीय रकमेचा हिशेब न ठेवता अभिलेखामध्ये चुकीची नोंद करुन शासनाची दिशाभूल करुन फसवणूक करण्यात आली. 3 लाख 4 हजार रूपये ही रक्कम गायकवाड यांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापर करुन शासनाची फसवणुक केली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक देवकते करत आहेत.        

हे प्रकरण कसे आले उघडकीस...

पोलिस ठाण्याचा मेंटेनन्स, तपासासाठी लागणारा निधी, वीज बील असा खर्च मोहरील फंडातून केला जातो. वार्षिक अहवाल नवनियुक्त पोलिस निरीक्षक डॉ. होळकर यांनी घेतला असता त्यामध्ये अनियमितता आढळून आली. सहायक फौजदार रामदास गायकवाड यांच्याकडे होती. 30 एप्रिल 2021 पासून एसबीआय बँकेतून परस्पर रक्कम परस्पर रक्कम हडप करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow