शहागंज ब्लॉक काँग्रेसच्या वतीने संघठन सृजन अभियान अंतर्गत बैठक संपन्न...
शहागंज ब्लॉक काँग्रेसच्या वतीने संघठन सृजन अभियान अंतर्गत बैठक संपन्न...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - काँग्रेस पक्ष संघठन अधिक मजबूत करण्यासाठी व जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष व विविध सेलचे अध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या वतीने राज्यात काँग्रेस संघठन सृजन अभियान सुरू केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निरीक्षक म्हणून विवेक बन्सल यांची निवड केली आहे. ते प्रत्येक ब्लॉक मध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाकडे अहवाल सादर करणार आहे. शुक्रवारी सायंकाळी शहागंज ब्लॉक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक इब्राहीम पटेल यांनी किराडपुरा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विवेक बन्सल यांचे त्यांनी स्वागत केले व पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घ्यावे लागतील. दलित व अल्पसंख्याक समाजाला पक्षासोबत जोडण्यासाठी कोणते उपाय सुचवले याबद्दल माहिती दिली.
या बैठकीत शहराध्यक्ष युसूफ शेख, प्रदेश सचिव डॉ. सरताज पठाण, इंजिनिअर इफ्तेखार शेख, ताहेर पटेल, इस्माईल पटेल, शेख नईम, शेख आसेफ, शेख आरेफ व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?