महापालिकेचे नुतन आयुक्त अमोल येडगे यांनी स्विकारला पदभार, जाता जाता मावळते आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतली सुरक्षारक्षकांची भेट...

 0
महापालिकेचे नुतन आयुक्त अमोल येडगे यांनी स्विकारला पदभार, जाता जाता मावळते आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतली सुरक्षारक्षकांची भेट...

नुतन महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी स्विकारला सुट्टीच्या दिवशी पदभार....

मावळते आयुक्त जी श्रीकांत यांनी जातांना मुख्य गेट वरील सुरक्षा रक्षकांना गाडी थांबवून केले हस्तांदोलन करून घेतली भेट...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- शहरातील अनेक प्रकल्प पुर्णत्वास नेणारे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी अखेर आज सायंकाळी 5.40 वाजता आपला पदभार नुतन आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे सोपवला. यावेळी त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नुतन आयुक्त अमोल येडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला त्यांनी सांगितले छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी आहे. अगोदर उपविभागीय अधिकारी व त्यानंतर बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा केली. यवतमाळ व कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मला शासनाने दिली. हे औद्योगिक शहर आहे. अपूर्ण असलेले प्रकल्प पुर्णत्वास नेणे व शहरातील नागरिकांना दर्जेदार व चांगल्या सुविधा कशा मिळतील याला प्राधान्य देणार आहे. पहील्यांदाच हि जवाबदारी मिळाली मी स्वतः इंजिनिअर आहे म्हणून खुप काही शिकायलाही मिळेल असे सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विभागातील प्रमुख अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

मावळते आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितले 2 वर्षे 11 महीने एक दिवस आयुक्त म्हणून शासनाने काम करण्याची संधी दिली म्हणून आभार मानले. प्रशासक म्हणून निर्णय घ्यायचा आणि अंमलबजावणी करायची यामुळे टिका होत होती. शहराच्या नागरीकांच्या भल्यासाठी जेवढे चांगले निर्णय होते विरोध असतानाही घेतले. पाण्याचा गंभीर प्रश्न होता. नवीन योजना माझ्या कार्यकाळात पूर्ण झाली. पैठणहून जॅकवेल पर्यंत पाणी आणण्यासाठी फार अडथळे निर्माण झाले. मुख्यमंत्र्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याची संधी मिळाली परंतु शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी सल मनात राहिल. माझ्या कार्यकाळात पाणी शहरात पोहोचले असते तर अधिक समाधान मिळाले असते. कचरा व सफारी पार्क प्रकल्प 95 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले. अनेक नवीन उद्याने उभारली. अतिक्रमणे काढली. नवीन आयुक्त ते प्रकल्प पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मावळते आयुक्त जी श्रीकांत यांनी असा कोणताही विभाग सोडला नाही तेथे कामाची छाप सोडली नाही. महापालिका शाळांमध्ये सिबिएससी व दर्जेदार शिक्षण, कर वसुली वाढवून करसवलत योजना प्रभावीपणे राबवली. जाता जाता मुख्य प्रवेशद्वारावर जी श्रीकांत यांनी गाडी थांबवून सुरक्षा रक्षकांना हस्तांदोलन करत भेट घेताना भावना अनावर झाले. त्यांची बदली रोखण्यासाठी प्रयत्न झाले पण नवीन आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर हे प्रयत्न निष्फळ ठरले हे पण खरे आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow