सावधान, शहरात रस्त्यावर कचरा फेकला तर दंड नंतर गुन्हा दाखल करणार महापालिका...!

 0
सावधान, शहरात रस्त्यावर कचरा फेकला तर दंड नंतर गुन्हा दाखल करणार महापालिका...!

शहर अस्वच्छ विद्रुप करणा-यांनो सावधान, शहरात कुठेही कचरा फेकल्यास महानगरपालिका शोधून दंड तसेच गुन्हा दाखल करणार...

एकाच दिवसात 500 पेक्षा जास्त व्यावसायिकांची तपासणी करून केला 90000 रुपयांचा दंड...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी कडक पाऊले उचलण्याचे चालू केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी सायंकाळी 06.00 ते 09.00 या दरम्यान शहरातील सर्व भागातील प्रमुख व्यावसायिक क्षेत्रामध्ये विशेष स्वच्छता तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 296 अन्वये हॉटेल्स, उपाहारगृहे व इतर व्यावसायिक आस्थापनांची साफसफाई विषयक तपासणी करण्याचा अधिकार आहे. *मा. आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार शहरातील व्यावसायिक क्षेत्रांमध्ये 29 दक्षता पथकांमार्फत विशेष स्वच्छता मोहीम नियमितपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये शहरातील अनधिकृत अनधिकृत बॅनर, होल्डिंग, स्टँडी, शहर विद्रुपीकरण, यावर कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच आयुक्त यांनी आदेशीत केले आहे की 18 जुलै पर्यत शहरातील सर्व अनधिकृत बॅनर, होल्डिंग नागरिकांनी व्यावसायिकांनी स्वतःहून काढून घ्यावे त्यांनतर महानगरपालिका ते काढून घेऊन संबंधितांवर शहर विद्रुपीकरणाचे गुन्हे दाखल करून कारवाई करणार आहे.

महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी सांगितले की शहरातील सर्व भागात दिवसातून दोन वेळा घंटागाडीद्वारे कचरा संकलनाची सुविधा उपलब्ध आहे. तरीही काही आस्थापनांकडून नागरिकांकडून कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ होत आहे. यावर आळा घालण्यासाठी दर सोमवार व गुरुवार सायंकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत सर्व 29 दक्षता पथक आपल्या प्रभागात तपासणी मोहीम राबवित आहे. या पथकाद्वारे शहरातील व्यावसायिक व निवासी भागांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे, तसेच दुकानासमोरील व परिसरातील स्वच्छतेची पाहणी करण्यात येत आहे, रस्त्यावर ठेवलेले साहित्य, दगड, पेव्हर ब्लॉक किंवा इतर अडथळ्यांची नोंद घेऊन त्यावर कारवाई करण्यात येत आहे, सार्वजनिक ठिकाणी डेब्रिस किंवा कचरा टाकल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे, रात्री कचरा टाकणाऱ्या व्यक्ती/आस्थापनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, तसेच प्रभागातील सर्व व्यावसायिक भागांची नियमितपणे तपासणी करण्यात येणार आहे, याबरोबरच दंडात्मक कारवाईसोबतच समुपदेशन व जनजागृतीवर भर देऊन आवश्यकतेनुसार कारवाई करण्यात येत आहे.

या स्थापन केलेल्या पथकामुळे शहरातील सर्व व्यवसायिकांवर जरब बसला असून या पथकाच्या कारवाईच्या धास्तीने व्यावसायिक कचरा हा घंटागाडी मध्येच देत आहे. हा सकारात्मक बदल दिसून येत आहे.

उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग श्री. नंदकिशोर भोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 16 जुलै रोजी पथकाने सायंकाळी केलेल्या पाहणी मध्ये 500 पेक्षा जास्त व्यावसायिक आस्थापनाची तपासणी करून 90000 रुपये पेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.

या पथकाच्या कामाची गती पाहून व व्यवसायिकांच्या वागणुकीमध्ये होणारा सकारात्मक बदल पाहून शहराचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते समीर साजिद, सभागृह नेते गोविंद केंद्रे यांनी अभिनंदन केले व पथकाला प्रोत्साहन दिले.

तसेच शहरातील सर्व CCTV च्या माध्यमातून व्यावसायिक भागामध्ये शहर अस्वच्छ तसेच विद्रुपीकरण करणाऱ्या नागरिकांवर शोधून दंड करण्यात येणार आहे किंवा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. अश्यातच दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळी हे पथक रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप या रोडवर वॉकिंग प्लाझा येथे पाहणी करत असताना एक अज्ञात इसमाने दुचाकीवर येऊन 2 बॅग कचरा रस्त्यावर फेकून दिला. या पथकाने त्या व्यक्तीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो व्यक्ती पळून गेला. यावेळी उपस्थित असलेले उपायुक्त श्री. नंदकिशोर भोंबे यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये काढलेल्या फोटो नुसार त्या दुचाकीचा नंबर MH20BP3303 या माहितीच्या आधारे छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यावर का

रवाई करत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow