सिल्लोडला दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) मंजूर झाल्याबद्दल इद्रीस मुलतानी यांचा वकील संघाने केला सत्कार...
सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) मंजूर झाल्याबद्दल इद्रीस मुलतानी यांचा तालुका वकील संघाच्या वतीने सत्कार
सिल्लोड, दि.7 (डि-24 न्यूज) - सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) मंजूर झाल्याबद्दल तसेच सिल्लोड तालुक्याचे भूमिपुत्र, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीचे अध्यक्ष इद्रीस मुलतानी यांना (राज्यमंत्री दर्जा ) यांनी दिवाणी न्यायालय सिल्लोड मंजुरीचा यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल
वकील संघाच्या वतीने त्यांचा उत्स्फूर्त व जाहीर सत्कार करण्यात आला.
सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) मंजूर झाल्याबद्दल इद्रीसजी मुलतानी यांचे सिल्लोड तालुका वकील संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) मंजूर होणे हा सिल्लोडच्या न्यायव्यवस्थेला अधिक बळकटी देणारा आणि तालुक्यातील नागरिकांसाठी न्यायप्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करणारा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या न्यायालयामुळे नागरिकांना न्यायासाठी दूरवर जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, न्यायालयीन कामकाज अधिक प्रभावीपणे आणि सोयीस्कर पद्धतीने पार पाडण्यास मोठी मदत होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नामुळे, व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच मंत्री अतुलजी सावे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झाल्यामुळे इद्रीस मुलतानी तसेच सिल्लोड तालुका वकील संघाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी सिल्लोड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक दादा तायडे, सचिव ॲड. हमीद खान, उपाध्यक्ष ॲड. संतोष झाल्टे यांच्यासह ॲड. डी. बी. जैवळ, ॲड. अभय देशपांडे, ॲड. अनिस अहमद, ॲड. जे. पी. मगर, ॲड. शेख उस्मान, ॲड. इरफान पठाण, ॲड. ए. एस. लोखंडे, ॲड. विलास आर. महाजन, ॲड. के. एस. मोटे, ॲड. बी. के. दांडगे, ॲड. जी. व्ही. ढोणे, ॲड. विजय मंडलेचा, ॲड. शांताराम काकडे, ॲड. एस. एस. दौड, ॲड. एस. के. ढाकरे, ॲड. एस. जी. बोराडे, ॲड. मंगेश पंडित, ॲड. सुनील गुळवे, ॲड. इम्रान खान, ॲड. सय्यद रिजवान, ॲड. नजीर तडवी, ॲड. अंकुश गव्हाणे, ॲड. ए. एस. निकाळजे, ॲड. विशाल शेजुळ, ॲड. विशाल सुरडकर, ॲड. के. पी. झलवार, ॲड. कैलास इंगळे यांच्यासह महिला प्रतिनिधी ॲड. निलोफर शेख व ॲड. वैजयंती पंडित आदी उपस्थित होते.
यावेळी सिल्लोड तालुका वकील संघातील सर्व सन्माननीय वकील बांधवांनी केलेल्या आपुलकीच्या व उत्स्फूर्त स्वागताबद्दल इद्रीसजी मुलतानी यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. सिल्लोडच्या न्यायव्यवस्थेला अधिक सक्षम करणारा दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) मंजुरीचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, या निर्णयामुळे न्याय मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिल्लोडच्या विकासाच्या वाटचालीतील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) मंजुरीचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, न्यायव्यवस्था, नागरिकांच्या सुविधा आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या निर्णयाचे मोठे महत्त्व आहे. तसेच सिल्लोडच्या भूमिपुत्राला राज्यमंत्री दर्जा मिळणे हीदेखील संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?