शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एनएसयुआयने मिठाई वाटप करत जल्लोष केला...

 0
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एनएसयुआयने मिठाई वाटप करत जल्लोष केला...

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर एनएसयुआयने मिठाई वाटप करत केला जल्लोष 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)-: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आज निराला बाजार येथे एनएसयूआय महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष डॉ. शादाब अब्दुल रहमान शेख यांच्या वतीने विजय उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक उपस्थित राहिले आणि एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. डॉ. शादाब शेख यांनी सांगितले की, एनएसयूआय, भारतीय युवक काँग्रेस आणि संपूर्ण काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासूनच NEET पेपर लीक प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संघर्ष केला असून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीचा हा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील. यावेळी सागर प्रकाश मुगदिया, अभिषेक शिंदे (जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय), सृजन गावंडे, नाजिम खान एजाज शेख (सेंट्रल अध्यक्ष), शिर्ष साठे (ईस्ट अध्यक्ष), डॉ. फैसल (सरचिटणीस), सुमेध जाधव, उमेर सय्यद (सचिव), अदनान किरमानी, ऋषिकेश डुकले तसेच एनएसयूआयचे पदाधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow